Friday, 11 December 2015

मॅगी कळा जाहिरात कला

 noodles : Instant noodles. Texture. Close up.   आली बाई एकदाची परत. हुश्श ! 

                     चला, केवढा मोठा प्रश्ण सुटला.

अगदी झोकात ऐटीत मोठा भाव वधारून सर्वत्र विराजमान झाली.
हो ! भाव वधारणार नाही तर काय ? आगमनाची दवंडी नको पिटायला ? त्या आधी    ` वी मिस यु ' चा घोषा लावून झाला. (जणू काही सर्वत्र उपासमारच चालली होती. ) ह्या सगळ्याचे पैसे कुठून येणार ?   सगळ्यांच्या खिशात हात नको घालायला ?    पण कुणाचं काही म्हणण ? छे छे ! उलटा सर्वत्र आनंदीआनंद; अगदी दिवाळी आल्याचा झाला नसेल इतका आनंद. साहजिकच म्हणा. `खुशियो की रेसिपी ' न ती ! हो मॅगीच ती ! भारतातील सगळ्यात प्रसिद्ध व यशस्वी फूड ब्रान्ड.  

काही महिन्यांपूर्वी संध्याकाळी घरी आले तर मुलीचे ८-१० मित्रमैत्रिणीं जमलेले. तसे नेहमीच येतात पण आज जरा मूड थोडा वेगळा दिसला - तोंड जर पडलेली.
मी अवाक. रिझल्ट प्रकरण पूर्वीच आटपल होते. कॉलेज सुरु व्हायला पण अजून ५-६ आठवडे बाकी. मग ह्याचं काय बर बिनसले ?
तेव्हड्यात एकजण बोलला ``शी यार, माझा अमेरिकेत एम एस करायला जायचा एकमेव आधाराचा धागा तुटला .''
`ऑ ! हे जी आर ई  तर या वर्षी किवा पुढच्या वर्षी देणार. मग आत्ताच शस्त्र का टाकली ? ''
``आता झटपट जेवणाला दुसरा काही पर्याय आहे का, मॅगी सोडून ? "
आता मामला लक्षात आला. मॅगीच्या अस्तित्वावर गदा म्हणजे या पिढीच्या जीवन मरणाचा प्रश्ण. थेट पोटाचाच प्रश्ण. साधारण या वयोगटातील ( १५-२० वर्षे ) मुलांचे बालपण आणि मॅगी यांची नाळ एकदम घट्ट जुळलेली ! बालपणी उमटलेले काही ठसे पुसणे कठीणच. वर्षनुवर्षे ``मम्मी भूख लगी " म्हणणाऱ्या मुलांना ``बस दो मिनिट " म्हणत गरमागरम मॅगी देणारी सुपर माँम अन मान डोलवत मॅगीचा गुंतावळा तोंडात खेचून घेणारी मुल, वर `फास्ट टु कुक, गुड टु इट' , ` टेस्ट भी, सेहत भी ची ग्वाही.  रोज अगणित वेळा टीव्ही वर दिसणारी जाहीरात. या मॅगीच्या गुंतावळ्यानी एकही घर गुंडाळायचे सोडले नाही. आता मॅगी हद्दपार होतेय म्हटल्यावर यांच्या मेदुचा भुगा !
``अरे एवढच ना? आपल्याकडे आहेत ना टू मिनिट पर्याय - उपमा , पोहे , डोसा. एवढ टोक कुठे गाठताय ? "  इती मी.
मुलांच्या तोंडावर पटत पण वळत नाही असे भाव.
काही महिन्यांपूर्वी मॅगी मध्ये लेडचे प्रमाण  मान्यताप्राप्त प्रमाणापेक्षा जास्त आढळल्या मुळे बंदी घालण्यात आली होती. पाच महिन्यात काय गुंतावळे झाले नाहीत ? करोडोंच्या नुकसानीचे दावे , आरोप प्रत्यारोप, कुणाच्या नोकरीवर गदा तर कुणाचे उखळ पांढरे ! कंपनीने ज्या लॅब मध्ये परीक्षण झाले त्यांच्याच  विश्वसनीयते बाबत प्रश्न उपस्थित केला आणि कोर्टाने त्या लॅब व त्यांचे रिपोर्ट विश्वसनीय नसल्याचे मान्य करून मॅगी सुरक्षित असल्याचे मान्य केले. झालेबंदी उठली.
आता पुन्हा नव्याने पदार्पण. वर ग्वाही, `तुमची मॅगी सेफ होती आणि आहे' . झाले ! पुन्हा मॅगी घराघरात; नव्हे अगदी घरपोच सुद्धा ! घरबसल्या ऑर्डर आणी मॅगी घरात. स्नॅपडील वर म्हणे पाच मिनिटात साठ हजार `मॅगी वेलकम कीट ' विकले गेले.
एकच गोष्ट परत परत सांगून डोक्यात ठासून भरायची - अगदी विचारशक्ती कुंठीत होई पर्यंत. 
धन्य ती जाहिरात कला !

Thursday, 26 November 2015

ओवन फ्रेश वन !     
ओवन फ्रेश, दादर शिवाजी पार्क येथील खव्वैयांची कायम गर्दी खेचणारे एक लोकप्रिय फूड जइन्ट. प्रत्येक विकएन्डला येथे ३०-४० मिनिटांचे वेटिंग असतेच. पूर्णतः शाकाहारी असलेल्या या जागी इटालियन, मेक्सिकन, कॉन्टीनेन्ल पदार्थांची भरपूर व्हरायटी मिळते. शिवाय इथल्या मेनूत वेळोवेळी बदल केले जात असल्यामुळे प्रयेक वेळेला नवीन काहीतरी ट्राय करायला मिळत. त्यामुळे नेहमी तिथेच जाऊन तेचतेच खायचा कंटाळा आला वगैरेचा प्रश्नच येत नाही.
एक मात्र नक्की, इथल्या डिशेश वर ताव मारताना वजन,लरीची चिंता घरी विसरून यायची. इथल्या बऱ्याचशा डिशेशमध्ये क्रीम व चीज अगदी भरभरून असत. डाएट च्या बाबतीत जास्त जागरूक असाल तर पोटाला हलक आणि ताजतवान करणार लेमन कोरीयांर सूप  आणि जोडीला वेज वोक एकदम मस्त मेनू . बाकी सूप पासून डीझर्ट पर्यंत काहीही डोळे झाकून मागवा, रसना तृप्त होणारच.
जेवणा व्यतिरिक्त ओवन फ्रेशला मुद्दाम अगदी वाट वाकडी करून  जाव ते त्यांच्या पेस्ट्री व बेकरी प्रडक्ट्ससाठी. त्यांचे ताजे डोनट्स, वेगवेगळे ब्रेड्स , ब्रेड स्टिक्स , किश , बिस्किट्स , केक विशेषतः डेट वलनट केक यांचा मोह टाळणे अशक्य.  त्यांची केक आणि पेस्ट्री लाजबाब. स्पेशल ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जाणारे बर्थडे केक अप्रतीम. एक से एक डिझाईन छोट्यांना आणि आई बाबानाही वेड  लावणारे. एन्टरन्स पाशीच असलेला खास चकलेटचा काऊन्टरही खुणावतोच. आता अशा खास  केक, पेस्ट्री व चकलेट साठी खिसा जरा हलका करायला लागणार हे सांगायला नकोच.  

एक गोष्ट मात्र खटकते - सततची गर्दी आणि दाटीवाटीने केलेली आसन व्यवस्था या मुळे या जागेला एका गजबज गोंधळ असलेल्या कॉलेज कन्टनचे स्वरूप येते. तेवढ सोडल तर, ओवन फ्रेश एकदम एवन !      

Wednesday, 8 July 2015

रिकाम्या घरात आईनं करायचं काय?

  • First Published :
    Lokmat 09.07.2015
  • मुलं परदेशी शिकायला गेल्यावर जास्त पोकळी जाणवते ती आईला. साहजिकच म्हणा ! मुलं सतत आईभोवती असतात; तसंच आईचं जीवनही ही मूलकेंद्रित जास्त असतं. ब:याच जणींनी मुलांच्या संगोपनासाठी स्वखुशीने नोकरी सोडून पूर्णवेळ आई कम गृहिणी होणं स्वीकारलेलं असतं. त्यामुळे मुलं शिकायला बाहेर पडली की आईला पहिला प्रश्न भेडसावतो, तो म्हणजे आता या रिकाम्या वेळेचं मी करू काय?   
    ब:याचदा अशा आया ‘एम्टी नेस्टर सिंड्रोम’ला बळी पडतात. आता आयुष्यात काही करायला नाही, रिकामपण कसं घालवायचं हा प्रश्न भेडसावतो. याचा परिपाक म्हणजे चिंता, चिंता आणि फक्त चिंता. सतत मुलांची काळजी आणि प्रश्नांचा भडिमार, सतत चौकश्या आणि बारीकसारीक गोष्टीत सल्ले. 
    ‘माझा मुलगा रोज अर्धा तास स्काइपवर असतो, जाताना त्याच्याकडून तसं प्रॉमिस घेतलं होतं’ - एक मैत्नीण अभिमानानं सांगत होती. 
    ब:याच आयांचा मुलांनी रोज स्काइपवर येऊन रोजचा अहवाल द्यावा असा अट्टहास असतो. पण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हेच अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही. मुलांना तिथं घरकामापासून जेवण, अभ्यासार्पयत सगळी कामं एकटय़ानं करायची असतात. परत तिथली अभ्यास पद्धती जरा वेगळी असते. मुलांना त्यासाठी खूप वाचन, नेट सर्च करून बरीच माहिती गोळा करावी लागते. याव्यतिरिक्त इंटर्नशिप आणि नोकरीसाठी शोध, अर्ज करणं, नेटवर्किग करणं, मुलाखतीसाठी तयारी यासाठी वेळ द्यावा लागतो. 
    तेव्हा रोज आपण मुलांचा किती वेळ घ्यावा याचा आईनं विचार करायला हवा. तसंही नंतर नंतर मग ‘काय खाल्लं’ या व्यतिरिक्त रोज बोलायला काही शिल्लक राहत नाही. मुलं पण कंटाळतात. यापेक्षा रोज व्हॉट्स अॅपवर मुलांची खुशाली घेऊन आठवडय़ातून एकदा अथवा दोनदा मुलांच्या सोयीनं स्काइपवर गप्पा मारणं जास्त सयुक्तिक ठरेल. 
    तसंही मुलांचे तिकडचे प्रश्न नुस्ते समजून नुसती चिंताच करत बसल्यास मुलं त्यांचे प्रश्न सांगणं बंद करतात. केवळ एक चिंतातुर आई न बनता मुलांची मार्गदर्शक, एक भक्कम आधार व जवळची खंबीर मैत्नीण बनण्याकडे भर द्यायला हवा. त्यामुळे त्यांना सतत सल्ले, सतत प्रश्नांची विचारणा, सतत काही ना काही भुणभुण हे सारं बंद करून टाकायला पाहिजे. 
    मुलं परदेशी गेली म्हणजे आपल्याला आता कायमची दुरावली वगैरे विचार मनातून झटकून टाकावेत. आजकाल नोकरीच्या निमित्तानेही मुलांना बाहेर घरापासून लांब दुस:या शहरात अथवा देशात जावे लागतेच. बदलत्या काळाचे हे सत्य मान्य करणं आणि आपल्या जीवनातला आनंदाचा झरा झुळझुळता ठेवणं आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपल्या रिकामपणावर आपण उत्तर शोधावं. स्वत:साठी काहीतरी आवडेल असं करावं.
    सोपं नाही हे तसं. पण या नाजूक अवस्थेतून जावं लागतंच. आणि मग काही वर्षानी घरटय़ातून उडून पिलू जेव्हा जबाबदार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व होऊन आपल्याला भेटतं, भरारी घेण्यासाठी सज्ज झालेलं दिसतं तेव्हा त्याला खुल्या आकाशात मोकळं सोडण्याचा, पंखांना बळ देण्याचा आपला निर्णय योग्यच होता याची खात्नी पटते. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. मुलांना जन्मभर तर आपण पुरणार नसतोच! त्यांना त्यांच्या जीवनप्रवाहात तरण्यासाठी, गगनभरारीसाठी तयार करणं हेच तर आईचं काम. ते तिनं केलं की आपल्या ओढाताणीचंही चीज झाल्यासारखं वाटतं!
     
    मोकळ्या वेळाचं आईनं 
    करायचं काय?
    1) रिकामा वेळ घालवण्यासाठी स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यावं. एखादा छंद जोपासावा.
    2) मुलांशी संपर्कात राहण्यासाठी, संवाद साधण्यासाठी  नवीन तंत्नज्ञान आत्मसात करावं. फेसबुक, व्हॉट्स अॅप शिकून घ्यावं.
    3) मुलांच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर पुढील शिक्षण घेणा:या हल्ली अनेकजणी आहेत. आमची एक मैत्नीण दर सहा-आठ महिन्यांनी कुठलातरी कोर्स पूर्ण केल्याचे मेसेज व्हॉट्स अॅपवर टाकत असते. 
    4) आयुष्यात आलेलं रिकामपण भरून काढण्याचा हा सकारात्मक प्रयत्न. आपल्याला हवं ते, आवडेल ते, राहून गेलेलं करावं. पूर्ण आनंदानं आहे ती परिस्थिती स्वीकारून अधिक आनंददायी पर्याय शोधावेत. आनंदी राहावे.
     कीर्ती कुलकर्णी
    ‘keerti.anulekhan@gmail.com

Wednesday, 1 July 2015



स्वत:ला सावरशील ना.?

  • First Published :
    lOKMAT , jULY 2, 2015
  • कीर्ती कुलकर्णी
     
    मुलं परदेशी निघाली की,आधी स्वत:ला आणि मग त्यांना विचारायला हवं की, तिथल्या एकटेपणाचं काय करशील? स्वयंपाक येतो? मग काय खाशील? रोजचे खर्च, वेळेवर सगळं करण्याची शिस्त आणि स्वातंत्र्यात स्वत:ला सांभाळण्याची जबाबदारी. हे सारं कसं सांभाळशील?
    ------------
    मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना संपूर्ण कुटुंबानं करायच्या मानसिक तयारीचा विचार आपण मागच्या लेखात केला. आता या लेखात आपण मुलांच्या तयारीचा थोडा वेगळ्या अंगानं  विचार करून पाहू.
     
    मनोधैर्य 
     
    मुलं दाखवत नसली तरी प्रथमच लांब एकटं जाण्याचं टेन्शन त्यांनाही असतंच. अशातच आता एकदा गेल्यावर निदान सहा महिने ते वर्षभर भेट होणार नाही या विचारानं सतत वाईट वाटून घेणं, आपण एकटं कसं राहणार याची सतत चिंता करणं या धास्तीनंही मुलांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं. तेव्हा या विषयांवरच्या चर्चा आपण निदान मुलांसमोर तरी टाळायला हव्यात. आईवडील आपल्यासाठी बराच खर्च करत असल्याची जाण असण्याएवढी ही मुलं समजूतदार आणि प्रगल्भ असतात. पण ती या गोष्टींचं अवाजवी टेन्शन घेणार नाहीत हेदेखील पालकांनी पाहिलं पाहिजे. सकारात्मक विचार मुलांचे पंख अधिक बळकट करतात यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.
    त्यामुळे जाणं अगदी दोन दिवसांवर आल्यावर अचानक मुलांनी हातपाय गाळले तर सांगा त्यांना.
    ‘तुला तिथेही सगळा अभ्यास जमेलच, तेवढी तुझी पात्रता आहेच; पण यदाकदाचित त्या जागतिक स्पर्धेच्या महासागरात थोडं कमी पडलं तरी काही खूप फरक पडत नाही. गेलं म्हणजे अगदी जिंकूनच आलं पाहिजे असं थोडंच आहे? तिथली शिक्षण पद्धती, एकटं लांब जाऊन, राहून, सगळं पाहून येणं हेही एक शिक्षणच आहे, त्याचाही तुला खूप उपयोग होईल.’
     
    खर्चाचं नियोजन 
     
    तिथे गेल्यावर मुलांना दैनंदिन खर्चाचं नियोजन करावं लागतं. मोबाइल बिल, घरभाडं, क्रे डिट कार्ड, त्यांची बिलं न विसरता वेळेवर भरणं, टॅक्सची कागदपत्रं वेळेवर सबमिट करणं ही कामं  स्वत: करावी लागतात. तेव्हा शक्य असल्यास आधीपासूनच मुलांना बँक व्यवहार, बिलं भरणं अशा कामांची थोडी सवय करावी. 
    शिक्षणाच्या खर्चाव्यतिरिक्त दैनंदिन राहण्याचा खर्चही आपण उचलत असल्याची कल्पना मुलांना द्यावी. कारण शिकत असताना दर आठवडय़ाला काही तास काम करण्याची परवानगी असली, तरी लगेच गेल्या गेल्या सगळ्यांना नोकरी मिळेलच असं नाही. तसंच रोजचा खर्च उचलण्यासाठी नोकरीत वेळ आणि एनर्जी किती घालवायची, अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा याचं गणित जुळवणंही महत्त्वाचं. तेव्हा सध्या अभ्यासाला प्राध्यान्य असून, पैसा कमावणं महत्त्वाचं नाही हे त्यांना सांगायला हवं. बचत अथवा काटकसर कशासाठी करावी आणि कशासाठी करू नये हे वेळोवेळी चर्चा करून पटवून द्यावं. कारण तिकडे आजारी पडणं अतिशय खर्चिक असतं. (आर्थिक आणि भावनिकदृष्टय़ाही.)
     
    खाण्याच्या सवयी, वेळेचे बंधन 
     
    परदेशात राहायचे तर स्वत:ला शिस्त लावून घेणं अत्यावशकच. ठरल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर जाणं म्हणजे वेळेवर, अगदी ठरल्या वेळेच्या ठोक्याला पोहोचणो म्हणजे उशीर आणि ठरल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचणो अक्षम्य हे त्यांचं तत्त्व.  वेळेच्या बाबतीत सगळे अगदी काटेकोर असतात.  त्यामुळे ‘अरे ! थांब. हा आलोच, हे काय झालंच’   म्हणत माणसाला 10-20 मिनिटं ताटकळत ठेवण्याचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वागणा:या आपल्याला ते वेळेचं बंधन पहिले आत्मसात करावं लागत. म्हणून मुलांना पहिल्यापासून वेळेची शिस्त लावलेली उत्तम. 
    परदेशात स्वत:चं जेवण स्वत: बनवावं लागत असल्यामुळे आधीपासूनच मुलांना जरु रीपुरता स्वयंपाक करायला शिकवणं उत्तम. जेवण करायला घरीच शिकवावं. कमीत कमी वेळात आणि कष्टात पोटभर व पौष्टिक काय खाता येईल हे मुलांना वेळोवेळी सांगत राहावं. अन्यथा वारंवार रेडी टू इट, न्यूडल्स, पिङझा, बर्गर खाऊन जाताना शिडशिडी शेलाटय़ा बांध्याची लेक सहा महिन्यात बर्गर साईज होते.
     
    जगण्याचं नवं स्वातंत्र्य
     
    गेल्याच आठवडय़ात अमेरिकेहून येताना माङया शेजारी तिथे शिकत असलेला एक भारतीय मुलगा सुट्टीसाठी घरी येत होता. विमान उड्डाण झाल्या झाल्या पठ्ठय़ाने हवाई सुंदरीला दारू कधी सव्र्ह करणार असं विचारलं! प्रवासात मनसोक्त दारू रिचवून झाल्यावर मुंबईला उतरण्याची वेळ झाल्यावर महाशय माउथ फ्रेशनरनं तोंड खळबळून मोकळे.
    ब:याचदा इथे पारंपरिक, सामाजिक बंधनात वाढलेली मुलं तिथे अचानक पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर बेताल वागतात आणि घरच्यांना त्याचा थांगपत्ता नसतो. अनेक गोष्टींबद्दल दबलेले कुतूहल, आकर्षण, स्वातंत्र्य, मित्रपरिवाराचा दबाव, तिथली स्वैर राहणी या सर्वाचा तो परिपाक असतो. तेव्हा बदलत्या काळाप्रमाणो मुलांना योग्य तेवढं स्वातंत्र्य द्यावं जेणोकरून त्यांचे काही गोष्टींचे आकर्षण कमी होऊन चांगलंवाईट यातील फरक, त्यातील सीमारेषा कळेल. म्हणून मुलांशी मित्रत्वाच्या नात्यानं संवाद असणं गरजेचं आहे.
     
    एकटेपणा 
     
    आयुष्यात एकटेपणासारखं दु:खद व भयावह काही नाही. कधी न कधी त्याला तोंड द्यावे लागतेच. अमेरिकेसारख्या समृद्ध देशाला जणू एकटेपणाचा शापच आहे. इथे जाण्यापूर्वी आपल्याला एकटं राहायला लागू शकतं ही खूणगाठ प्रत्येकाने बांधावीच. त्या तयारीतही असावं. इथून जाताना जरी मित्रमैत्रिणी रूममेट्स म्हणून असले, तरी नंतर नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरांत ते जाऊ शकतात. अशावेळी कुणी रूम पार्टनर मिळाला नाही तर एकटं राहण्याशिवाय पर्याय नाही. या सा:याची मानसिक तयारी करून घेतली, जाणीव असली की मग घेऊ द्यावी खुशाल भरारी!
     
    keerti.anulekhan@gmail.com

Friday, 26 June 2015

लग्नाआधीच पाठवणी

  • First Published :
    ( Lokmat Sakhi 18.06.2015)

  • मुंबई एअरपोर्टवर विमान उतरण्याच्या तयारीत असल्याची उद्घोषणा झाली आणि नजर खिडकी बाहेर गेली. अंधारात लुकलुकणारे दिवे मुंबापुरीचं विहंगम दृश्य. विमान उड्डाण घेताना अथवा उतरताना दिसणारे शहराचं हे विहंगम दृश्य, दिवसा उजेडी अथवा रात्रीच्या अंधारात कायमच मला मोहित करतं. पण आज परत एकदा डोळे पाण्यानं भरले. अश्रूंचा बांध व हुंदका आवरताना नाकी नऊ आले. आलो परत घरी काळजाचा तुकडा हजारो मैल लांब सोडून-एकटा ! ज्यांची मुले परदेशी शिकत असतात अशा प्रत्येक आईची अशीच भावावस्था होत असणार. 
    पंचवीस वर्षांपूर्वी याच पिल्लाला एकटं बेबीसीटरकडे  अथवा कामवालीजवळ सोडून जाण्याचा विचारही असह्य झाला होता, आपल्या वेळेवर सर्वप्रथम हक्क मुलांचा म्हणून नोकरी, करिअर सगळ्यावर बेधडक पाणी सोडलं आणि फ्लेक्झी वर्किंग अवर्सची मुभा म्हणून व्यवसाय मार्ग पत्करला. बोलबोल म्हणता वीस वर्ष भुर्रकन उडाली आणि एक दिवस ऑफिसमधून आल्यावर लेक म्हणाली, 
    ‘ममा, कॅट बरोबर जी.आर.ई. पण देऊ का ?  
    ‘ हो, दे ना ! काही हरकत नाही. कॉम्पिटिटिव्ह इक्झाम द्यायचा फायदा होतो. सगळे ऑप्शन्स एक्स्प्लोर करायचे. जिथे बेस्ट कोर्स व कॉलेज मिळेल ते घ्यायचे,  इकडे अथवा बाहेर. ग्लोबल इक्स्पोजर पण असावं, खूप फरक पडतो! आपल्या कक्षा रु ंदावतात. इ . इ .’ सांगत माङो तत्त्वज्ञान मी तिला सांगितले. (आमच्या वेळेला बौद्धिक पात्रता असूनही परदेशी शिकायला जाणं, विशेषत: मुलींना,  अगदी सहजसाध्य नव्हतंच. त्यामुळे आता आपल्या मुलांना इच्छा असल्यास आडकाठी करायची नाही, त्यांच्या प्रगतीत मायेचा अडसर टाकायचा नाही हा विचार पक्का होताच). 
    यथावकाश लेकीचं  जी.आर.ई, टोफेल, अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे अभ्यासक्र म आणि त्याप्रमाणो प्रवेशअर्ज भरणं वगैरे प्रक्रि या चालू होती. मी आपली तटस्थ. कदाचित कुठेतरी मनात अर्ज केले म्हणून लगेच प्रवेश मिळाला असं थोडंच आहे असं मनात असावं आणि  कॅटचा ऑप्शन पण आहेच असा दिलासाही होता.
    ‘ममा, आज रात्री श्रुती आपल्याकडे जेवायला आणि झोपायला येणार आहे. आम्ही सगळे रात्री एअरपोर्टवर जाणार आहोत.’  
    ‘का ?’
    ‘अगं, आमच्या ग्रुपमधले तीन सिनिअर्स चालले न आज अमेरिकेला’  
    ‘ बरं , ठीक ’
    दुस:या दिवशी सकाळी ; ‘काय गेले मित्र तुमचे?’   
    ‘हो ! आणि ममा, रोहनची आई एवढी रडत होती; बापरे! ’ 
    ‘हो न ! साहजिकच आहे. एवढय़ा लांब एकटं पाठवायचं. पण ठीक आहे न ! आता करिअर करायचं तर करायला लागतं. इथे सुद्धा काय मुंबईतच सगळं मिळेल असं थोडंच आहे. घरापासून लांब जावंच  लागणार कधीतरी. ’ माझी अजूनही सगळी तार्किक विचार मीमांसा सुरूच होती.
    पण यथावकाश अमेरिकेतील दोन अतिशय प्रथितयश विद्यापीठात प्रवेश मिळाला, व्हिसा पक्रि या पार पडली आणि प्रथमच जाणवलं, अरे ! ही तर आता चालली. आधी शिक्षण, मग नोकरी मिळाल्यास तिथेच स्थायिक- म्हणजे ही आता कायमचीच चालली! लग्न करून मुली सासरी जातात तशीच ! परदेशी शिकायला जाणा:या सगळ्या मुलींच्या आयांची हीच अवस्था. लग्नाआधीच मुलींची पाठवणी! कायमची - दूर - मैलोन्मैल दूर. प्रत्यक्ष भेट क्वचित कधी - वर्षा दोन वर्षांनी - फक्त 2-3 आठवडे; बस तेवढाच सहवास. मुलींचं ग्रॅज्युएशन संपताच आपला त्यांच्याबरोबरचा सहवास पण संपत येतो. पाठवणीची तयारीही तशीच सुरू होते. लग्नासारखीच - नवीन कपडे, नित्य गरजेच्या वस्तू, भांडी अशा बराच गोष्टी. आणि त्यांचं मनोधैर्य ढळू नये म्हणून उरातली काळजी लपवत, कोरडय़ा डोळ्यांनी हसतमुखानं ‘यशस्वी भव’चा निरोप !

परदेशी जाताना मनाची तयारी

  • First Published :
     (Lokmat Sakhi on 25/06/2015)
  •  मे महिन्यातलं रणरणतं ऊन. मुंबईतल्या बांद्राकुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीच्या अमेरिकन वकिलातीच्या बाहेर व्हिसासाठी भली मोठी रांग. माझ्या बाजूला एक मध्यमवयीन जोडपं. 
    ‘‘तुम्ही स्वत: जाताय का अमेरिकेत फिरायला?’’
    ‘‘नाही. मुलगा गेलाय आत मुलाखतीला; तो चाललाय शिकायला तिकडे !’’ - उत्तरात वडिलांचा मुलाबद्दलचा रास्त अभिमान.
    ‘‘अरे व्वा ! मग, तयारी झाली बाकीची?’’ 
    ‘‘हो. आर्थिक तयारी पहिल्यापासून ठेवलीच होती. शैक्षणिक कर्जाचं कामही पटकन झालं. बाकी काय, हल्ली मुलांना आपल्यापेक्षा जास्त समजतं. त्यांचं नेटवर्किग जोरदार असतं. तेच नेट, गुगल वगैरेवरून सगळी माहिती काढतात. त्यांचं तेच बघतात. आपण फक्त त्यांना काय लागेल ते पुरवायचं, मदतनीस म्हणून! आता व्हिसा झाला की फक्त पॅकिंग !’’ -अगदी साचेबंद आणि अपेक्षित उत्तर. 
    तेवढय़ात मुलगा उजळ आनंदी हस:या चेह:यानं येताना दिसला. झालं, काम फत्ते ! आता अमेरिकेला शिकायला जाणं निश्चित. 
    माउलीचे डोळे अचानक पाण्यानं भरले. 
    अश्रू आनंदाचे की दु:खाचे ही संभ्रमावस्था. 
    माझ्या मनात मात्र प्रश्नचिन्ह. ‘खरंच यांची तयारी पूर्ण झालीय?’
    ‘हाऊ टू प्रिपेअर फॉर स्टडी अब्रॉड’ वगैरे तत्सम गुगल सर्च मारला तर परदेशी शिकायला जाताना काय काय तयारी करावी याच्या ब:याच साइट्स आणि ब्लॉग्ज मिळतात. त्यात प्रामुख्यानं अभ्यासक्रम व विद्यापीठाची निवड, प्रवेशप्रक्रिया व त्यासाठी लागणारी कागदपत्र, पासपोर्ट व व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया, शैक्षणिक कर्ज कसं मिळवावं, संवादकौशल्य व इंग्रजी सुधारायला काय करावं, जाण्यापूर्वी कोणत्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात, कोणत्या लसी टोचून घ्याव्यात इत्यादी सर्व माहिती इत्थंभूत मिळते. ही सगळी झाली अत्यंत गरजेची व्यावहारिक तयारी. 
    पण याहीपलीकडे जाऊन काही मूलभूत तयारी अत्यावश्यक असते , स्वत:ची आणि मुलांची! यावर काही विचार?  
    मुळात आपलं मूल प्रथमच आपल्यापासून दीर्घकाळासाठी हजारो मैल लांब आणि तेही एकटं जाणं हीच एक मोठी भावनिक उलथापालथ करणारी घटना. त्यातून आजकालच्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात तर फारच पोकळी निर्माण करणारी. तेव्हा यासाठी संपूर्ण कुटुंबाची भावनिक स्तरावर काही तयारी असणं अत्यंत गरजेचं असतं. 
    ब-याचदा अर्ज करणं ते व्हिसा मिळवणं या प्रक्रियांच्या मालिकेत सगळा वेळ भरभर निघून जातो आणि जाणं काही दिवसांवर येऊन थडकतं. ब-याचदा मुलाला निरोप दिल्यावर आई-वडिलांना जाणवत की, या धावपळीत मुलाबरोबर खरंतर वेळ मिळालाच नाही आणि दु:ख अधिकच तीव्र होतं. मुलालाही तिथे पोचल्यावर आता सगळं एकटय़ानं ‘फॅमिली सपोर्ट’ शिवाय करायचंय याची प्रथमच जाणीव होते आणि कुठे एकटं लांब येऊन पडलो या अचानक होणा-या जाणिवेनं जरा जास्तच होमसिक वाटू लागतं. तेव्हा परदेशी जाणारी मुलं, त्यांचे आईबाबा आणि घरातले इतर अशी सगळ्यांची ही भावनिक-मानसिक तयारी अगोदरपासून असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचाही विचार करायला हवाच!
     
    भावनिक-मानसिक तयारीचे काही धडे 
    1) ब-याच विद्यापीठांमध्ये 2-3 सत्रांपर्यंत (एक सत्र सहा महिन्यांचे) प्रवेश राखून ठेवता येतो. तेव्हा जरुरी वाटल्यास एखादं सत्र उशिरा जावं पण मनाची पूर्ण तयारी करूनच जावं. 
    2) या कालावधीत संपूर्ण कुटुंबानं एकमेकांसाठी वेळ द्यावा. शक्य असल्यास आठपंधरा दिवस एकत्र फिरुन यावं.  
    3) घरात पाठोपाठची भावंडं असल्यास त्यांच्याही भावनांचा विचार आवश्यक आहे. कारण जोडीचा भाऊ/बहीण लांब गेल्यावर दुस-याला अचानक एकटं पडल्यासारखं वाटून अभ्यासावर व वागण्यावर परिणाम होऊ शकतो. 
    4) याबाबत माझ्या मैत्रिणीचं उदाहरण खूप बोलकं आहे. मैत्रिणीच्या मुलीला नोव्हेंबरमध्ये जानेवारीच्या सत्रापासून प्रवेश मिळाल्याचं समजलं. त्याचवेळी धाकटी मुलगी बारावीला होती. तिच्या अभ्यासावर परिणाम नको व मोठीच्या तयारीलाही पुरेसा वेळ मिळावा म्हणून एक सत्र उशिरा जाण्याचा सारासार निर्णय त्या कुटुंबानं घेतला.  ज्याचा त्यांना फायदा झाला.

Friday, 19 June 2015

 UNBROKEN

Unbroken , A World War II Story Of Survival, Resilience And Redemption by Laura Hillenbrand , a survival epic of Louie Zamperini, an American Olympic runner who joins Air Force after the World War II breaks out. On one of his bombing missions, the plane crashes and Louie with two of his mates survive. They drift on a raft for 47 days – struggling with thrust, hunger, sharks, weather, and bombing attacks – with just one hope that someday they will hit the land. Hit the land they do but… unfortunately an enemy territory – an island in possession of Japan. From there onwards begins the plight  - torture as the POW ( prisoners of war) – an unbelievable yet very true account of the inhuman treatment given to POW by the Japanese during WW II. No stone was left unturned to take away the dignity of a human being.

While living everyday in the shadow of death ( fear of being executed anytime ) , just one ray of hope that America will win the War gave them the strength to endure all the hardships ( too mild a word for what they had to go through ) and keep struggling for the survival.  The sources of the hope were  -  the limited and vague news about the war from the new prisoners that kept coming to the camp and the news papers which they used to steal from the officers’ room. Both the jobs were very risky as the prisoners were not even allowed to look at each other.

It exemplifies how a ray of hope and the desire to meet the loved ones ( who you know are waiting for you ) can make one a super human being and give strength and will power to fight just any odd.

Though the book is a biographical account of  Louie Zamperini, its representative – an account of all Pacific POWs – brutality they faced , their struggle for survival during the War as POWs and post War – the struggle with the horrible memories and nightmares ( post war effect) and start a normal life again. Many had physical deformities, severe illness, mental imbalance ; some never came out of it , many were so traumatized that they kept silent and even the closest ones could never know what they went through. Louie too struggled  through the phases of complete hatred, vengefulness  ( to the extent of planning a murder of the most brutal camp officer) to forgiveness and peace of mind.

The writer has really done a marvellous job of penning the entire account with great details and yet make it very interesting, gripping; it has the quality of possessing the reader. The amount of research done to gather the information and verify the details is amazing. The greatness of the writer is, she does not restrict the subject to just the life story of a single person but sees the opportunity to make it a bigger platform –the story of all Pacific POW of WW II – so much so that the book almost becomes a historical document.  In the writer’s own words,`` the best subjects offer the opportunity to use a small story to tell a much larger one ‘’.

Observations like :
``The dead weren’t numbers on a page. They were their roommates, their drinking buddies, the crew that had been flying off their wings ten seconds ago. Men didn’t go one by one. A quarter of a barracks was lost at once. There were rarely funerals, for there were rarely bodies. Men were just gone, and that was the end of it.’’
“Life was cheap in war”
“War is a crime against humanity”

Speak volumes – just the ego, greed and ambition of a handful politicians made the entire humanity suffer, devastated them. Millions perished....That’s WAR !