ओवन फ्रेश एवन !
ओवन फ्रेश, दादर शिवाजी पार्क येथील खव्वैयांची कायम गर्दी खेचणारे एक
लोकप्रिय फूड जॉइन्ट. प्रत्येक विकएन्डला येथे ३०-४० मिनिटांचे वेटिंग
असतेच. पूर्णतः शाकाहारी असलेल्या या जागी इटालियन, मेक्सिकन, कॉन्टीनेन्टल पदार्थांची
भरपूर व्हरायटी मिळते. शिवाय इथल्या मेनूत वेळोवेळी बदल केले जात असल्यामुळे
प्रयेक वेळेला नवीन काहीतरी ट्राय करायला मिळत. त्यामुळे नेहमी तिथेच जाऊन तेचतेच
खायचा कंटाळा आला वगैरेचा प्रश्नच येत नाही.
एक मात्र नक्की, इथल्या डिशेश वर ताव मारताना वजन, कॅलरीची चिंता घरी
विसरून यायची. इथल्या बऱ्याचशा डिशेशमध्ये क्रीम व चीज अगदी भरभरून असत. डाएट च्या
बाबतीत जास्त जागरूक असाल तर पोटाला हलक आणि ताजतवान करणार लेमन कोरीयांडर सूप आणि जोडीला वेज वोक एकदम मस्त मेनू . बाकी सूप
पासून डीझर्ट पर्यंत काहीही डोळे झाकून मागवा, रसना तृप्त
होणारच.
जेवणा व्यतिरिक्त ओवन फ्रेशला मुद्दाम अगदी वाट वाकडी
करून जाव ते त्यांच्या पेस्ट्री व बेकरी
प्रॉडक्ट्ससाठी. त्यांचे ताजे डोनट्स, वेगवेगळे ब्रेड्स , ब्रेड स्टिक्स , किश , बिस्किट्स , केक विशेषतः डेट वॉलनट केक यांचा
मोह टाळणे अशक्य. त्यांची केक आणि
पेस्ट्री लाजबाब. स्पेशल ऑर्डर प्रमाणे बनवून दिले जाणारे बर्थडे केक अप्रतीम. एक
से एक डिझाईन छोट्यांना आणि आई बाबानाही वेड
लावणारे. एन्टरन्स पाशीच असलेला खास चॉकलेटचा काऊन्टरही
खुणावतोच. आता अशा खास केक, पेस्ट्री व चॉकलेट साठी खिसा
जरा हलका करायला लागणार हे सांगायला नकोच.
एक गोष्ट मात्र खटकते - सततची गर्दी आणि दाटीवाटीने केलेली
आसन व्यवस्था या मुळे या जागेला एका गजबज गोंधळ असलेल्या कॉलेज कॅन्टीनचे स्वरूप येते. तेवढ सोडल तर, ओवन फ्रेश एकदम एवन !
No comments:
Post a Comment