कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं;
घरातच मला लॉकडाऊन केलं
घरात मी निवांत बसले;
अन घर माझे खुद्कन हसले
बैस निवांत कुशीत माझ्या;
घे तर खरा पाहुणचार माझा
मोकळी हवा; निळं आकाश
पक्ष्यांची किलबिल;
फुलांचा गंध
निरव शांतता; पर्णांची सळसळ
चांदणसडा; पहाट झुळूक
उपभोगायला सगळं असायचीस ना
उत्सुक ?
सगळं इथेच उपभोगून घे;
कुशीत माझ्या विसावून घे
निवांतपणा हा उपभोगून घे;
पाहुणचार माझा झोडून घे
कोरोना विषाणूंनी एक सुख दिलं;
घरपणाचं सुख मला दिलं.

No comments:
Post a Comment