Tuesday, 26 December 2017


२४.१२.२०१७


                           

राजस योग , रेशिमबंध
Related imageलगिनघाई, हास्यकल्लोल
वाटें जणू कालचेच सारे

हसत खेत दिवस गेले
बघता बघता वर्ष  सरले

कौतुक, आनंद, प्रेमाची उधळण 
असेच राहो भरजरी सहजिवन
                                                                                               
                                                                                      संसार होवो मोरपंखी सुंदर, आनंद अन सुखांच्या रंगांची उधळण 

                                                                                      प्रथम लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद
                                                                                      हा व सहजिवनाचा प्रत्येक दिवस आनंदी व अविस्मरणीय करा

Friday, 4 August 2017

The Man Who Planted Trees

Simple and short story, big message

The Man Who Planted Trees by Jean Giono


Read the Marathi translation of the book by Madhuri Purandare.
A very short book ( one can finish in one go ) ; simple narrative account of a chance visitor; very interesting and inspiring story of a native man who alone decided to plant trees on a barren land in Alps and did it single-handedly; dedicated his entire life for the cause. Irony is when during the two World Wars the entire world was on the verge of destruction, this man, Mr Bouffier, was patiently struggling for bringing back life to the region. Simple work but noble cause makes one extra-ordinary.
Credit to the writer who through the fictitious character of Mr. Bouffier tried to give the great message which is relevant even today ( rather shameful its more relevant today )

Friday, 21 July 2017

पालकत्व


नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला मैत्रीण भेटली; चांगलीच अपसेट आणि काळजीत होती .

झालं असं होतं की आदल्या रात्री तिची मुलीशी चर्चा चालली होती. मुलगी अलीकडेच नोकरीला लागलेय - चांगली नामांकित कंपनी, गलेलठ्ठ पगाराचा आयटी जॉब ! पहिल्या नोकरीचे नवेनवे दिवस त्यामुळे रात्री रोज आल्यावर गप्पा, चर्चा साहजिकच .

``आता तुला माहितेय आपल्यालाही नवीन नवीन नोकरीत नवखे असताना नाही का काही त्रास, मनःस्ताप व्हायचे ? लोक कशी फशी पाडतात. जीव आपला तुटतो म्हणून जरा सल्ला दिला - माणसांच्या दिसण्यावर आणि वरवरच्या बोलण्यावर जायचं नाही; बोलतात एक आणि करतात एक, राजकारण बरच चालतं वगैरे - तर ही एकदम चिडलीच.

मला काही समजत नाही का ? मला  बावळट समजलीस का ? आणि कहर म्हणजे आता या पुढे मी तुला कधीच काही सांगणार नाही म्हणून रागाने तिच्या खोलीत निघून गेली.''

तशी ती काही उठसूट सल्ले देणारी, प्रत्येक गोष्टीत दखल घेणारी, सतत लक्ष्य ठेवणारी आई नव्हती. किंबहुना तिच्याच मुलींच्या व त्यांच्या मित्रपरिवारांच्या शब्दात ती एकदम `कूल मॉम ' , मैत्रिणी सारखीच !

``काळजात असं चर्रर्र झालं सांगू. कसं गं वागायचं या मुलांशी ?''

मैत्रिणीची कळकळ आणि काळजी दोन्ही साहजिकच होतं; विशेषतः नुकत्याच घडलेल्या पार्श्वभूमीवर.

दोनच दिवसांपूर्वी उच्च शिक्षित, सधन, सुजाण, संस्कारी, जबाबदार पालकांच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी आत्महत्येचा निष्कर्ष काढण्यात आला  ( कदाचित घातपात अथवा अपघात असू शकतो - असल्यास दुर्दैव ) आणि सर्वत्र खळबळ माजली. सामाजिक माध्यमांवर या घटनेची कारणमीमांसा करणारे लेख शेअर केले जाऊ लागले. विशेष भर पालकांकडे मुलांसाठी वेळ नसण्यावर, मुलांच्या एकाकीपणावर. सर्वाला पालकच जबाबदार ! मुलं असमंजस, आततायी, असंयमी, आत्मकेंद्री असली तरी चूक पालकांचीच ! शेवटी मुलंच पालकांचं प्रगतीपुस्तक !  

खरंच आज पालकत्वाची परीक्षा देणं भारीच कठीण झालंय. पूर्ण संभ्रमात टाकणारा आणि कधी कधी तर अगदी सुन्न करणारा प्रश्न ! कारण निकषच कळेनासे झालेत. नक्की काय हवंय आणि कुठे कमी पडलो हेच कळत नाही. अचानक धक्कादायक निकाल समोर येतो - एखादे जिव्हाग्री लागणारे बोल, अबोला, घर सोडून जाणे, काहीच न सांगता घेतलेला घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय, तर कधी आत्महत्या ! आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही अनाकलनीय कारणास्तव सुसंवादाच्या पुलाचे बांधकाम कच्चे अथवा अर्धवट होते हे वास्तव स्वीकारण्याची पाळी पालकांवर येते.

आपणच अगदी प्रेमाने वाढवलेलं मुल आपल्याशी मनमोकळं बोलू शकत नाही, तेव्हढे आपण त्याला आपलं वाटत नाही हे विष पचवणे किती कठीण आहे. याही पुढे जाऊन चांगलं खेळतं बोलतं मोकळेपणानी वागणारे मुलं वास्तविकतः मनात काही ठेवून होतं आणि मित्रत्वाने सगळं `शेअर ' करण्याचा बहाणा करत होतं हे तर किती भयंकर हादरवून टाकणारं.

आज घराघरात प्रत्येक सुजाण पालकाची झोप उडाली, प्रत्येकाला आज एकच प्रश्न भेडसावतोय - खरंच आपलं मुल आपल्याला मित्र, जवळचं मानतय का ? आपण कुठे कमी पडतोय का ? आपल्या मुलातही कुठे `मन्मथ ' दडलाय का ?

Thursday, 16 February 2017

अजिंक्य


 अजिंक्य


दोन ध्रुवांच्या गाभ्यात भरून राहिलेल्या गर्द काळोखासारखीच लपेटलेली रात्र
त्यातूनच आभार मानतो मी त्या विधात्याचेज्यानी दिली मला देणगी एका अजिंक्य आत्म्याची

परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेला मी ना कण्हतोकुथतो ना रडतो
नशिबाचे फटके खाऊन झालो रक्तबंबाळ तरी झुकलो नाही

या क्रोध व अश्रूंच्या जगापल्याडही एक भयावह सावली रेंगाळत आहे
तरीही वर्षानुवर्षे अनंत संकटं झेलूनही राहीन मी तसाच …. निर्भीड, अजिंक्य

उघडो दार स्वर्गाचे वा फार्मावो अनंत शिक्षा, बेपर्वा मी सगळ्याचा कारण;

शिल्पकार मी माझ्या नशिबाचा
मार्गदर्शक मी माझ्या आत्म्याचा


(Translation of a very famous poem Invictus by William Ernest Henley ( 1849-1903)who contracted tuberculosis of the bone at the age of 12 years; had leg amputated at the age of 17 years.Immediately after the amputation he was told that his other leg would require a similar procedure. Fortunately his one leg was saved and with one leg he led an active life till the age of 53 years. The poem was written soon after his leg was amputated. How courageous and determined!)
********************************************************************************

                    Invictus

Out of the night that covers me,
      Black as the pit from pole to pole,
I thank whatever gods may be
      For my unconquerable soul.

In the fell clutch of circumstance
      I have not winced nor cried aloud.
Under the bludgeonings of chance
      My head is bloody, but unbowed.

Beyond this place of wrath and tears
      Looms but the Horror of the shade,
And yet the menace of the years
      Finds and shall find me unafraid.

It matters not how strait the gate,
      How charged with punishments the scroll,
I am the master of my fate,
      I am the captain of my soul.                     

         - William Ernest Henley