यवतमाळ जिल्ह्यात
कंत्राटी ठेकेदारांनी केसांच्या पिना, टिकल्या अश्या क्षुल्लक वस्तुंचा मोह दाखवून गरीब आदिवासी मुलींची फसवणूक केली. आज शेकोडो कुमारी
माता येथे तोंड लपवून जगत असल्याची धक्कादायक बातमी नुकतीच उजेडात आली . त्या निमित्ताने...........
लढा
जगणे झाले
दुरापास्त मुली झाल्या स्वस्त
पिना
टिकल्यांच्या बदल्यात शील झाले भ्रष्ट
कुणीही वापरा ,
कशिही
नागवा
कुणी काढा कसलाही
फतवा
मानसिकता कधीच न
ही बदलायाची
दोन पायांची
वस्तु ही भोगायाची
घाबरून सोसून
चालत नाही
पदरी काहीच पडत
नाही
झगडल्याशिवाय मिळत
नाही
न्यायही याला
अपवाद नाही
आत्मसन्मानार्थ
द्रौपदी लढली
अपमानाची ठिणगी
पेटती ठेवली
आत्मसन्मानाच्या
महाकुंडात
नराधमांची
राख केली
अपहरण, वस्त्रहरण चालुच आहे
दुर्योधन ,
दुशासन पिसाट
आहेत
गरजच आहे आता
पुन्हा महाभारत घडण्याची
अगदी शेवटपर्यंत
लढण्याची
उठा हो जागा द्रौपदी सकला
एकजुटीने पेटवा
वणवा
नकोच अर्जून वा
कृष्ण सखा
तुम्हीच लढा
तुमच्या स्वबला
नुरलेच काही
गमवायाला
लढा आता केवळ
जिंकायाला
No comments:
Post a Comment