सर्वदूर हिंडता
जलदापरी
अचानकच येती
सामोरी
डॅफोडिल्स् सुंदर सोनेरी
तळ्य़ाकाठी
तरुभोवती
नाचती गाती डोलती
पवनासंगे झुलती
कटाक्षात येती
लक्षलक्ष हे सारे
आनंदविभोर फेर
धरती सारे
नाभोगणातील
लखलखते तारे
पसरती अथांग ओळीत
सारे
त्यासम भासती मज
हे सारे
जलदलहरी आनंदे
उधाण भरती
पण हे त्यावरही
मात करती
आनंदे न्हाऊन
निघाले
कविमन हे
यांच्यासंगती
अनिमिष लोचनी
दिव्य देखता
खुळाची झालो
बघताबघता
विचारच मनी जरा न
शिवला
दिव्या खजिना
निसर्गे दावला
उदास खिन्न मानसी
गमता
कधी कुठे निवांत
बसता
रिकाम्या मनी एकांत
क्षणी
झळकती अचानक
मनपटलावरी
सुखानंदी आरूढ मन
हे माझे
नाचते डोलते
डॅफोडिल्स् संगे
( an attempt of free trancreation of Wordsworth's `Daffodils' )
छान आहे ... बालकवींची छाप आहे या कवितेवर
ReplyDelete