प्रत्येकाच्या आयुष्यात चीरस्मरणात रहातील असे अनेक
अनुभव येतच असतात. एखादा सुखद अनुभव वाट्याला आला की त्याचा पुनःप्रत्यय घ्यावासा
वाटणं तसं मनुष्य धर्माला धरूनच. पण म्हणुन काय आपण ते क्षण जसेच्या तसे परत
जगण्याचा आटापीटा करतो का आणि समजा केलाच तर पहिल्यांदा मिळाला तसा आनंद थोडाच
मिळतो ? अशा अनुभवांतला आनंद हा तो अनुभव पहिल्यांदा घेण्यातच असतो हेच काही जण
विसरतात.
आता आमच्या मित्राचच उदाहरण घ्या. त्याला एक विचित्रच
सवय आहे – एखाद्या आनंददायी अनुभवाचा पुनःप्रत्यय घेण्याची. आता कुणी विचारेल, `यात
वावगं ते काय ? हे स्वाभाविकच नाही का ?’ नक्कीच मान्य; पण य़ात मेख अशी की असं
करून ब-याचदा त्याचा विरस होतो. `पहिल्या सारखी मजा नाही आली’ म्हणुन नाराज होतो.
परवा तर त्याने अगदी कहरच केला. गेल्या वर्षी
लग्नाच्या तिस-या वाढदिवसाला त्याने पत्नीला चक्क आश्चर्याचा धक्काच दिला होता.
संध्याकाळी पत्नी ऑफिस मधून घरी आली तर पठ्ठ्या स्वतः बटर चिकन बनवून स्वागताला
तयार. आता आपल्या नव-याला स्वयंपाकघर कुठच्या दिशेला आहे हे देखिल माहीत नसणार अशी
पक्की खात्री पटलेल्या त्या बिचारीची काय अवस्था झाली असणार विचार करा. आनंद व
आशर्याने बिचारीला भोवळ यायची काय ती बाकी राहिली. आता हा दोघांच्या आयुष्यातला
एकमोवाद्वितीय क्षणांतला एक ! स्मृतीत जपून ठेवाचचा व कधी तरी त्या स्मृतीगंधात
आकंठ डुंबायचा ! पण कसलं काय ? जयंताच तो. त्याला पत्नीची
प्रतिक्रिया एवढी आवडली की पुन्हा तशीच प्रतिक्रिया पहाण्याची ओढ अनिवार्य होऊन
परवा परत लग्नाच्या चौथ्या वाढदिवसालाही सगळं तसच्या तस रिपीट अगदी बटर चिकन सहीत.
पत्नीला आनंद झाला पण यंदा काही वेगळं चाललं असतं म्हणाली. `आमच्या
आयुष्यातल्या खास दिवशी तिचे ते खास आश्च्रर्यमिश्रीत भाव मला परत एकदा बघायचे
होते. कदाचित् यंदा बटर चिकन निटशी जमली नाही ’ इती नाराज मित्र. आता दोष
बटर चिकनचा नाही हे याला कुणी समजवायचं ?
आनंददायी अनुभव हे कितीही हवेसे वाटले तरी ते परतपरत
अनुभवण्यानी त्यात तोचतोचपणा येऊन कंटाळवाणे होतात. त्याच त्याच अनुभवांना चिकटून
रहाण्यापेक्षा आयुष्यात येणारे अनेक नवीन क्षण, अनेक प्रसंग अनेकविध प्रकारे
अनुभवल्याने आयुष्य मोरपंखी बनते.
आयुष्यातील काही मॅजिक मोमेंट्सना वन्स मोअर दिला की
त्यातील मॅजिक टचच जातो तर काही अनुभव असे हि असतात जे आपल्या जादूने प्रत्येक
वेळी आयुष्य अधीक आनंदी व समृद्ध करतात.
sundar lihilas kirti...ekhadi magic movement hi ekadach yete hech satya ahe..
ReplyDeletevery true. कोणत्याही गोष्टीची गोडी पहिलटपणात असते ती नंतर नेहमी कमी होते कारण बहुधा surprise element निघून गेलेले असते.
ReplyDelete