आजच्या मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
२००४ साली त्या कॉलेजच्या पोट्ट्याने आपल्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात रहाण्यासाठी फेसबुक नावाची टुम काय काढली नी बोलबोल म्हणता जाळ पसरत गेल की हो. या फेसबुकद्वारे जगभर अनेकांचे स्नेहबंध जुळले, अनेकांना हरवलेले जुने मैत्र मिळाले. कैकांना या पोट्ट्याने आपले ऋणी केले. अस्मादीक त्यातलेच एक. आज ज्या फेसबुकद्वारे तुमच्याशी संवाद साधतेय त्याचं नुसत नाव निघालं की मस्तकशूळ ऊठायचा. अहो करणार काय ? आमची रडकथा इतर आयांपेक्षा वेगळी थोडीच असणार ? बुकं उघडायची सोडून सदोदीत फेसबुकच उघड !
एक दिवस गंमतच झाली. अचानक शाळामित्राचा फोन आला आणि सर्व शाळा मित्रमैत्रिणींचा शोध घेऊन भेटायचं ठरलं आणि आम्ही या फेसबुकच्या जाळ्यात अडकलो. प्रत्यक्षात भेटण्याआधी फेसबुकवर भेटलो. तीस वर्षांनंतरचे ते चेहरे पहायला काय मजा वाटली ! त्या दिवसापासून आम्ही फेसबुकभक्त झालो.
आणि एक दिवस तर मोठीच गंमत झाली. लॉग केलं तर एक मेसेज येऊन पडलेला माझी आई ( पूर्वाश्रमीचं नाव वगैरे ) तुमच्या नावाच्या तिच्या मैत्रिणीचा ( व इतर कॉलेज व शैक्षणीक वर्षांचे तपशील ) बरेच वर्ष शोध घेत असून तुम्ही त्याच असाल तर मला उत्तर पाठवा. आनंदाला पारावार न रहाणे म्हणजे काय ते पुन्हा एकदा अनुभवले. अजुन एक कॉलेज मधली अत्यंत जिवाभावाची, संपर्क तुटला म्हणुन हळहळ लागून राहिलेली मैत्रीण सापडली.
खरच ! फेसबुकनी नुसत्याच त्या जुन्या व्यक्तींशी परतभेट नाही घडवली - दिली जुनी गहिरी नाती बालमैत्रीची, पुसट झालेले ठसे अधीक ठळक केले. बालमैत्रीच्या रेशीमगाठी परीपक्वतेच्या वेष्टनाने अघीक धृढ झाल्या.
ना कर्तव्यपूर्तीचा ताण
ना अपेक्षांच ओझ
नसतीच कसले बंध
गाणच ते मुक्तछंद
बंधाविणाच ते नात धुंद
करे जीवन बेधुंद
(काही वर्षांपूर्वी फेसबुकवर टाकलेली पोस्ट आज मैत्रीदिना निमित्त ब्लॉगवर )